अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले.यातून ती गर्भवती झाल्याचा प्रकार साक्री तालुक्यातील मांजरी गावात घडला.पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलगी गर्भवती;संशयित तरुण गजाआड



पिंपळनेर,दि.10साक्री तालुका (प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)


लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले.यातून ती गर्भवती झाल्याचा प्रकार साक्री तालुक्यातील मांजरी गावात घडला.पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संशयित तरुणाला पकडण्यात आले.साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मांजरी गावात एक अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे.घरात कोणीही नसल्याची संधी साधून गावातच राहणाऱ्या तरुणाने गाने मुलीला आपल्या घरी बोलावून घेतले.तिच्याशी अंगलट करु लागला.तिने विरोध केला असता आपण लवकरच लग्न करु असे सांगून तिचा विश्वास संपादन केला.मुलीने याला विरोध करत माझे अजून लग्नाचे वय नाही असे सांगून सुध्दा त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.वारंवार हा प्रकार घडल्याने मुलगी यातून 8 महिन्याची गर्भवती झाली. मुलाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीने पिंपळनेर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार बुधवारी दुपारी 4 वाजता संशयित अनिल बाबुराव माळचे (वय 20,रा. मांजरी ता.साक्री) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच रात्रीतून अनिल माळचे याला पोलिसांनी अटक केली आहे.घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक बी.जी.शेवाळे करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new