📰 शिरपूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: अवघ्या २४ तासांत २६,००० रुपयांच्या घरफोडीचा छडा
शिरपूर (प्रतिनिधी): शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अवघ्या २४ तासांत २६,००० रुपये रोख रक्कमेच्या घरफोडीचा तपास करत आरोपीस शिताफीने अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. ही उल्लेखनीय कारवाई नागरिकांतून कौतुकास पात्र ठरत आहे.
घटनेचा तपशील:
फियांदी मयुर दत्तु सोनार (वय ३०, व्यवसाय – चहा दुकान व जनरल स्टोअर्स, रा. करवंद ता. शिरपूर) यांनी फिर्याद दिली होती की, ८ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता ते ९ जुलै रोजी सकाळी ६.०० वाजेच्या दरम्यान त्यांचे "कृष्णामाई अमृततुल्य चहा दुकान व जनरल स्टोअर्स" या बंद दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दुकानात घुसून ड्रॉवरमधून २६,५०० रुपये चोरले.
या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गु.नं. ३४६/२०२५ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास व अटक:
मा. पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने वेगाने तपास सुरू केला. पोहेकॉ राजेंद्र रोकडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, करवंद गावातील तबरेज शेख नाजीम शेख (वय २४) यानेच चोरी केली आहे.
त्यावरून शोधमोहीम राबवली असता तो कळमसरे गावाजवळील अरुणावती नदीच्या पुलाजवळ संशयितरित्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विश्वासात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मुद्देमाल हस्तगत:
तबरेज याच्या अंगझडतीदरम्यान त्याच्या पॅंटच्या खिशातून खालील प्रमाणे रोख रक्कम हस्तगत करण्यात आली:
- ₹५०० दराच्या ४९ नोटा – ₹२४,५००
- ₹१०० दराच्या १५ नोटा – ₹१,५००
एकूण: ₹२६,०००
अधिक तपास:
सदर आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र रोकडे हे करीत आहेत.
ही कामगिरी खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल गोसावी,
पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाचे –
राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, भटु साळुंके,
मनोज महाजन, मनोज दाभाडे, सचिन वाघ, प्रशांत पवार, आरीफ तडवी, सोमा ठाकरे,
उमेश पवार व होमगार्ड मिथुन पवार – यांचा सक्रिय सहभाग होता.
🔒 नागरिकांनी सतर्क राहावे व अशा घटनांची तातडीने माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.