कृपया प्रसिद्धीसाठी,. "राजपूत चेतनामंच छत्रपती संभाजीनगर तर्फे वर वधु परिचय मेळावा संपन्न

 


कृपया प्रसिद्धीसाठी,. "राजपूत चेतनामंच छत्रपती संभाजीनगर तर्फे वर वधु परिचय मेळावा संपन्न".        माननीय संपादक महोदय, दैनिक...राजपूत चेतनामंच छत्रपती संभाजी नगर तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा बारावा राज्यस्तरीय वधु वर परिचय मेळावा दिनांक 21/07/2024 रोजी आशापूर्ती मंगल कार्यालय, सिडको, छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झाला. या वधु वर परिचय मेळाव्यास 154 इच्छुक युवक युतीने नोंदणी केली व नवीन नोंदणी 104 अशी होती. हा मेळावा विदुर , घटस्फोटीतांसाठी सुध्दा खुला होता. कार्यक्रमाची सुरुवात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना पुष्पांजली अर्पित करून त्याचप्रमाणे दिप प्रजनन करून करण्यात आली याप्रसंगी शहराचे पालकमंत्री खासदार संदिपान जी भुमरे, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र जी चौव्हाण, राजेंद्रजी जंजाळ, एडवोकेट आनंदसिंग बायस, श्री.धरमसिंहजी जनकवार, अजिंक्यजी सावे, निर्मला परदेशी पी. आय कवरसिंग जी बैनाडे, सोमनाथ जी परदेशी, डॉक्टर भारतसिंग चौव्हाण व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना राजपूत चेतनामंचाचे अध्यक्ष जगतसिंग परिहार यांनी केली. त्याचप्रमाणे प्राध्यापक प्रकाश सिंग गौर, शंभू सिंग दीक्षित, विजय सिंग झाला, महेंद्रसिंग ठाकूर, गुलाबसिंग हजारी,शंकर सिंग ठाकूर, पदम सिंग राजपूत, महाजन चुगडे, संतोष सिंग ठाकूर, भगवान सिंग चौव्हाण , विजयसिंह परदेशी, प्रतापसिंग चौव्हाण, विठ्ठल सिंग परदेशी, विशाल सिंग परदेशी अमरसिंग ठाकूर, मनोजसिंग परिहार, महेंद्रसिंह परिहार, प्रसादसिंग ठाकूर, सौ. नीता बायस, भारती ठाकूर, रश्मी गौर, सुनिता गौर, ज्योती राजपूत, श्रुती ठाकूर, सविता राजपूत, मोना राजपूत, भारती राजपूत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

2

3