पिंपळनेर महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा

पिंपळनेर महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा


लोकसंख्यावाढीचा वेग रोखण्यासाठी तरुणांनी पुढे यावे – प्राचार्य डॉ. लहू पवार यांचे आवाहन

पिंपळनेर, दि. 11 (साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)
पिंपळनेर येथील कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना, आयक्यूएसी व अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू पवार होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "वाढती लोकसंख्या म्हणजे नैसर्गिक संसाधनांवर ताण, प्रदूषणात वाढ आणि सजीवांवर दुष्परिणाम. या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तरुणांनी जनजागृतीत महत्त्वाची भूमिका बजावावी."

प्रमुख उपस्थिती:
प्रा. एल. जे. गवळी (कार्यक्रम अधिकारी, एनएसएस), डॉ. संजय तोरवणे (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), डॉ. नितीन सोनवणे, डॉ. एस. पी. खोडके (आयक्यूएसी समन्वयक) यांच्यासह अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर ठळक मुद्दे:

  • प्रास्ताविक: प्रा. एल. जे. गवळी
  • सूत्रसंचालन: डॉ. संजय तोरवणे
  • आभार: डॉ. एस. पी. खोडके

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. सतीश मस्के, डॉ. आनंद खरात, प्रा. एम. व्ही. बळसाणे, प्रा. भूषण वाघ, प्रा. तुषार तोरवणे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

छायाचित्र:
प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांची उपस्थिती – छायाचित्र अंबादास बेनुस्कर


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new